प्रेयसीच्या दगाबाजीमुळे ड्रग्जसाठ्याचा भंडाफोड ?

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
- नागपूर पाेलिसांची यशस्वी कारवाई
 
अनिल कांबळे
नागपूर, 
Drug Trafficking उप्पलवाडीतील एका फ्लॅटमध्ये तब्बल साडेसात किलाे एमडी ड्रग्ज जप्त केल्याच्या प्रकरणाला नवीनच वळण लागले आहे. आराेपी मझहर अली अकबर अली (30) हा विवाहित असून त्याने तरुणीला अविवाहित असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवले हाेते. तिचे लैंगिक शाेषण करुन तिचा ड्रग्ज तस्करीसाठी वापर करीत हाेता. प्रियकराने केलेल्या दगाबाजीमुळे प्रेयसीने बदला घेण्यासाठी प्रियकराचीच टीप खबऱ्यायार्माफत पाेलिसांपर्यंत पाेहचविल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, नागपूर पाेलिसांनी गेल्या 15 दिवसांपासून सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली.
 
 
mk ddk
 
नागपुरातील अंमली पदार्थ तस्करीच्या इतिहासात सर्वांत माेठी कारवाई रविवारी नागपूर पाेलिसांनी केली. पाेलिस उपायुक्त संदीप पखाले यांनी केलेल्या याेग्य नियाेजनामुळे हा सापळा यशस्वी झाला. उप्पलवाडीतील एसडीपीएल आश्रय इमारतीत पाेलिसांनी रविवारी सकाळी छापा टाकला. येथून पाेलिसांनी अंमली पदार्थ तस्कर मझहर अली अकबर अली (30) याच्याकडून काेट्यवधी रुपये किंमतीचे साडेसात किलाे एमडी अंमली पदार्थ जप्त केले. त्याने हा अंमली पदार्थ उत्तर प्रदेशातील तस्कराकडून मिळाल्याचे माहिती पाेलिसांना दिली. साेबतच हा अंमली पदार्थ नवी दिल्लीतून रस्ता मार्गे मध्यप्रदेशातून नागपुरात पाेचवण्यात आल्याचीही माहिती पाेलिसांना दिली.
 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तरुणीला मझहर अलीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, ताे विवाहित असल्याची माहिती तरुणीला मिळाली. त्यामुळे आपल्यासाेबत दगाबाजी केल्याची भावना तरुणीच्या मनात हाेती. त्याचा बदला घेण्यासाठी तरुणीने आपल्याच प्रियकराची टीप खबèयार्माफत पाेलिसांपर्यंत पाेहचवली. त्यानंतर पाेलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
अन्य राज्यातही नागपुरातून पुरवठा
Drug Trafficking  ड्रग्ज तस्करीचे उत्तरप्रदेश आणि दिल्ली कनेक्शन उघडकीस आले असून मझहर अलीकडे इतक्या माेठ्या प्रमाणात पाेचलेला एमडी अंमली पदार्थ एकाच वेळी आलेला नाही. दाेन ते तीन वेळा त्याची खेप नागपुरात आली हाेती. ती मझहर अलीने साठवून ठेवली हाेती. तस्करांकडून आणखी एक माेठी खेप नागपुरात येणार हाेती. मात्र सध्या सुरू असलेल्या सणासुदीमुळे पुरवठा साखळीतील छाेटे तस्कर सक्रिय नव्हते. त्यामुळे या खेपेचा पुरवठा लांबला हाेता.
टॅक्सी चालकाने केली मदत
गेल्या महिन्यात एका टॅक्सी चालकाला अंमली पदार्थ तस्करीत अटक केली हाेती. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत त्यानेच मझहर अलीची टीप पाेलिसांना दिली हाेती. पाेलिसांनी पकडलेला टॅक्सी चालक हा मझहर अलीच्या संपर्कात हाेता. अली देखील पूर्वी टॅक्सी चालवत हाेता. त्यामुळे चालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाेलिसांचे पथक 15 दिवसांपासून मझहर अलीवर पाळत ठेवून हाेते.