नवी दिल्ली,
GST वस्तू व सेवांचा सुधारलेला पुरवठा तसेच आयातीतून होणाऱ्या वसुलीत झालेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे मे महिन्यात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) एकूण वसुली 3.2 टक्क्यांनी वाढून 1.94 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली, असे सरकारी आकडेवारीने सोमवारी स्पष्ट केले.
मे महिन्यात एकूण जीएसटी संकलन 1.88 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. या कालावधीत देशांतर्गत व्यवहारांतून झालेली एकूण केंद्रीय जीएसटी वसुली 37,397 कोटी रुपये, राज्य जीएसटी 45,143 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी 51,190 कोटी रुपये इतकी नोंदवली गेली.वस्तूंचा करपात्र पुरवठा 26.9 टक्क्यांनी वाढला, हा देशांतर्गत मागणीचे प्रतिबिंब आहे, तर सेवा क्षेत्रातील हाच पुरवठा 22.2 टक्क्यांनी वाढला. यातून देशांतर्गत उपभोगातील संरचनात्मक लवचीकता दिसून येते. मे महिन्यात आयातीतून होणाèया आयजीएसटी संकलनात 19.1 टक्क्यांची वाढ होऊन ते 59,654 कोटी रुपयांवर पोहोचले. या माध्यमातून औद्योगिक क्षमतेच्या विस्ताराचे संकेत मिळत आहेत.
जीएसटीचे GST परतावे 2.6 टक्क्यांनी वाढून 27,281 कोटी रुपयांवर पोहोचले. परतावे समायोजित केल्यानंतर मे महिन्यातील निव्वळ जीएसटी महसूल 3.3 टक्क्यांनी वाढून सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांवर पोहोचला. एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलन 2.43 लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर होते.