बनावट खात्यांची चौकशी करणार

मुख्यमंत्री शुभेन्दू यांचे एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
कोलकाता,
Lakshmir Bhandar scheme पश्चिम बंगालमधील महिलांना आर्थिक मदत देणारी लक्ष्मीर भंडार योजना आता मोठ्या वादात सापडली आहे. राज्य सरकारने दावा केला आहे की, या योजनेअंतर्गत लाखो बनावट खाती तयार करण्यात आली आणि सरकारी निधीचा गैरवापर झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री शुभेन्दू अधिकारी यांनी पोलिस महासंचालकांना विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
 

Lakshmir Bhandar scheme 
नबन्ना सचिवालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लक्ष्मी भंडार योजनेअंतर्गत सुमारे 30 लाख खाती बनावट असल्याचे आढळून आले आहे. हे केवळ फसवणुकीचेच नव्हे, तर मनी लाँड्रिंगचेही प्रकरण असू शकते. अनेक अपात्र लोकांनीही या योजनेचा लाभ घेतला. विशेषत: महिलांसाठी असलेल्या या योजनेअंतर्गत पुरुषांच्या नावावरही पैसे काढण्यात आले होते, असा दावाही त्यांनी केला.
तपासात असे उघड Lakshmir Bhandar scheme झाले आहे की, अनेक पुरुषांनी खोटी कागदपत्रे सादर करून महिलांच्या आर्थिक सहाय्य योजनेचा गैरफायदा घेतला. काही लोकांना आधीच अटक करण्यात आली आहे. सरकारचा आरोप आहे की, मागील तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत या योजनेत मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा झाला होता. आता, बनावट लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी सरकार गाव आणि वॉर्ड स्तरावर तपास करणार आहे.एसआयटी केवळ बनावट खात्यांचाच तपास करणार नाही, तर कोणत्या खात्यांमध्ये सरकारी पैसे जमा झाले आणि ते कसे काढण्यात आले याचाही तपास करेल. जिथे आवश्यक असेल तिथे मनी लाँडरिंगचा तपासही केला जाईल. सरकारचा विश्वास आहे की, अनेक खात्यांमार्फत बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित करण्यात आले. तपास यंत्रणा बँकेच्या नोंदी आणि कागदपत्रांचीही तपासणी करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 
 
कठोर छाननीशिवाय फसवणूक रोखणे अशक्य
मुख्यमंत्री शुभेन्दू अधिकारी यांनी नवीन अन्नपूर्णा भांडार योजनेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, नवीन योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपयांपर्यंतची मदत मिळेल. या योजनेसाठी 12 पानांचा पडताळणी अर्ज तयार करण्यात आला आहे. विरोधी पक्ष या अर्जावर प्रश्न उपस्थित करत आहे. परंतु, मागील योजनेतील अनियमितता पाहता कठोर छाननी आवश्यक आहे. कठोर छाननीशिवाय फसवणूक रोखता येणार नाही, असा सरकारचा दावा आहे.