विधान परिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे सहा अर्ज

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
Legislative Council Election नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवार, १ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पाच उमेदवारांचे सहा नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. यात राजीव पोतदार (भारतीय जनता पार्टी), राजेश जंगले (अपक्ष), सुरेंद्र लोही (अपक्ष), दिनेश ढोले (इंडियन नॅशनल काँग्रेस), लोंढे (इंडियन नॅशनल काँग्रेस) या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात भारतीय जनता पार्टीकडून राजीव पोतदार यांनी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
 

dr-pottadar
 
Legislative Council Election  नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी २५ मे २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि. १ जून छाननी मंगळवार, २ जून रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरूवार ४ जून आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदान गुरूवार १८ जून रोजी होत असून सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवार २२ जून रोजी करण्यात येईल.