१७ जागांसाठी कोणाला मिळाली उमेदवारी? पाहा संपूर्ण यादी

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra Legislative Council election राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित होत्या. परिणामी, या मतदारसंघांतील विधान परिषदेच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्यसंख्येपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून दिले जातात. त्यापैकी यंदा सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक आणि अमरावतीसह विविध मतदारसंघांतील १७ जागांसाठी निवडणूक होत आहे.
 

Maharashtra Legislative Council election 
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अनेक मतदारसंघांत उमेदवारीवरून प्रचंड दावे-प्रतिदावे झाले. महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदही यानिमित्ताने उघड झाले.पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत बंडाळीचे चित्र दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी सुनील टिंगरे यांनीही पक्षाच्या तिकिटावर अर्ज दाखल केला. त्यामुळे पुण्यातील उमेदवारीचा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.
 
तर छत्रपती Maharashtra Legislative Council election  संभाजीनगर-जालना मतदारसंघात महायुतीमध्येच वाद निर्माण झाला. या जागेसाठी भाजपाने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली असताना शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे समीर सत्तार यांनीही अर्ज भरला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महायुतीमध्ये भाजपाच मोठा भाऊ ठरत असल्याचे उमेदवारी वाटपातून स्पष्ट झाले आहे. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर महायुतीने १७ जागांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. त्यामध्ये भाजपाने ११, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने २ जागांवर उमेदवार दिले आहेत.
 
 
भाजपाने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीMaharashtra Legislative Council election  मतदारसंघातून अरुण लखाणी, भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रवीण पोटे, सोलापुरातून राजेंद्र राऊत, सांगली-सातारातून धैर्यशील कदम, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघातून बसवराज पाटील, जळगावमधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली आहे.शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक, नाशिकमधून नरेंद्र दराडे, परभणी-हिंगोलीतून सईद खान आणि यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे मतदारसंघात विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असली तरी सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे.दुसरीकडे, महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वाधिक ८ जागांवर उमेदवार दिले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ५ जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष ३ जागांवर निवडणूक लढवत आहे.
 
 
काँग्रेसने चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली Maharashtra Legislative Council election  मतदारसंघातून शैलेश देशमुख, अमरावतीतून हर्षदीप देशमुख, यवतमाळमधून साहेबराव कांबळे, लातूरमधून महेश देशमुख, सोलापुरातून आदित्य फत्तेपूरकर, नागपूरमधून अतुल लोंढे तर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून दिलीप बनसोड, प्रफुल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर यांना उमेदवारी दिली आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नाशिकमधून अनिल कदम, परभणी-हिंगोलीतून डॉ. विवेक नावंदर, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर, जळगावमधून शरद तायडे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने पुणे मतदारसंघातून श्रीकांत पाटील आणि ठाणे मतदारसंघातून अभिजीत पवार यांना उमेदवारी दिली आहे. सांगली-सातारा मतदारसंघातील उमेदवाराबाबत मात्र अद्याप अनिश्चितता कायम आहे.
 
 
दरम्यान, छत्रपती Maharashtra Legislative Council election  संभाजीनगर-जालना मतदारसंघातून समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने त्या मतदारसंघातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या निवडणुकांकडे राज्यातील राजकीय पक्षांच्या ताकदीची चाचणी म्हणून पाहिले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी अनेक ठिकाणी झालेल्या घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.