तामिळनाडूत मोठा धक्का! मोठा नेता पक्षाला राजीनामा देणार

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
चेन्नई,
Major Shock in Tamil Nadu तामिळनाडूमध्ये राजनैतिक संघर्ष पाहायला मिळत होता, बरेच राजकीय नेते नाराज असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. यात तामिळनाडूतील भारतीय जनता पार्टीच्या पूर्व प्रदेश अध्यक्ष आणि दक्षिण भारतातील सर्वपरिचित चेहरा म्हणून बघितल्या जाणाऱ्या कुप्पुस्वामी अन्नामलाई यांनी पक्षाला सोडचिट्ठी देण्याचे ठरवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
Tamil Nadu
 
अन्नामलाई हे आज रात्री दिल्लीला पोहचणार असून ०२ जून मंगळवारला नितीन नबीन यांची भेट घेतील आणि आपला औपचारिक राजीनामा पक्षाला देतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नामलाई यांनी आपले मन बनवले आहे आणि दिल्लीची भेट केवळ राजकीय नसून पक्षाचे आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे.