हिंगणघाट,
‘Mann Ki Baat’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय मन की बात कार्यक‘माचे आ. समिर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. याप्रंगी आ. कुणावार यांनी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत मन की बात कार्यक‘माचे या श्रवण केले.
‘Mann Ki Baat’ पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या कानाकोपर्यातील नावीन्यपूर्ण उपक‘म, जलसंधारण, क‘ीडा क्षेत्रातील यश, पर्यावरण संवर्धन तसेच आत्मनिर्भर भारताच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीविषयी प्रेरणादायी विचार मांडले. समाजातील सामान्य नागरिकांच्या असामान्य कार्याला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा कार्यक‘म प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.