अनिल कांबळे
नागपूर,
md drugs शहरात अंमली पदार्थांच्या विराेधात माेठी कारवाई करत जरीपटका पाेलिसांनी तब्बल 7 किलाे एमडी (मेफेड्राेन) ड्रग्ज पावडर जप्त केली. एका तस्कराला अटक केली असून त्याच्या मैत्रिणीची चाैकशी सुरु आहे. या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 6 काेटी 80 लाख रुपये असून शहरात गेल्या अनेक वर्षांनंतर सर्वात माेठी कारवाई मानली जाते. या कारवाईमुळे शहरात गेल्या काही महिन्यांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मजहर अली अकबर अली (वय 32, रा. टेका नवी वस्ती, पाचपावली) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे.

उप्पलवाडीतील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये आराेपी मजहर हा मैत्रिणीसह राहत हाेता. या फ्लॅटमध्ये काेट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा ठेवला हाेता. तेथूनच एमडी संपूर्ण शहरात पुरविण्यात येत हाेते. पाेलिसांना एमडी ड्रग्जचा माेठा साठा असल्याची गाेपनीय माहिती मिळाली. पाेलिसांनी अनेक दिवस गुप्तपणे आराेपीवर नजर ठेवली. संशयास्पद हालचालींची खात्री झाल्यानंतर पाेलिसांनी उप्पलवाडीतील फ्लॅटवर छापा टाकला. झडतीदरम्यान फ्लॅटमधून सुमारे 7 किलाे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात आराेपीचा संबंध माेठ्या ड्रग्ज पुरवठा साखळीशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही खेप नागपुरात कुठून आली आणि पुढे काेणत्या शहरांमध्ये किंवा राज्यांमध्ये पाठविण्याचा कट हाेता, याचा तपास सुरू आहे.
ड्रग्जचे उत्तरप्रदेश कनेक्शन?
आराेपीला उत्तरप्रदेशातील काही तस्करांकडून ड्रग्जचा पुरवठा हाेत असल्याची माहिती समाेर आली आहे. सुमारे दहा दिवसांपूर्वी पाेलिसांनी एका संशयित ड्रग्ज तस्कराला अटक केली हाेती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर मजहर अलीपर्यंत पाेलिस पाेहाेचल्याची माहिती समाेर आली आहे. त्यामुले नागपूरचे उत्तरप्रदेश कनेक्शन उघडकीस आले आहे.
मैत्रिणीची भूमिकेबाबत संभ्रम
आराेपी महजहर अलीसाेबत फफ्लॅटमध्ये राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीची भूमिकाही आता तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. काेट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी त्या तरुणीचा वापर करण्यात येत हाेता. त्या तरुणीनेच फफ्लॅट भाड्याने घेतला हाेता. येणारे-जाणारे संशयित, आर्थिक व्यवहार, माेबाईल फोन, बँक खात्यांतील व्यवहार आणि काॅल रेकाॅर्डचीही कसून चाैकशी सुरू आहे.md drugs या प्रकरणात आणखी काही संशयितांची नावे समाेर येण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत आणखी अटकसत्र सुरू हाेऊ शकते. दरम्यान, 6.80 काेटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त करून नागपूर पाेलिसांनी माेठी कारवाई केली आहे.
मुली आणि तरुणी टार्गेट
शहरातील माेठमाेठ्या हाॅटेल्स, हुक्का पार्लर आणि पबसह फार्महाऊसमध्ये हाेणाèया पार्ट्यामध्ये एमडी ड्रग्ज पाेहचविण्याची जबाबदारी काही तरुणींवर टाकण्यात येते. पार्टी-पबमध्ये येणाèया शाळकरी मुली आणि तरुणींना आकर्षित करुन त्यांना ड्रग्जची सवय लावण्यात येते. त्यामुळेच पार्टी कल्चरच्या नावाखाली युवांमध्ये ड्रग्जची मागणी वाढत असल्याने त्याचा अवैध व्यापारही वेगाने विस्तारत आहे. काेट्यवधीचे ड्रग्ज बाजारात पाेहाेचले असते तर हजाराे युवक-युवती व्यसनाच्या विळख्यात अडकल्या जाणार हाेत्या.