शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात आग

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Ministry of Education office fire मध्य दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर संकुलात स्थित शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सोमवारी आग लागली. या घटनेनंतर तातडीने आपत्कालीन बचाव मोहीम राबवण्यात आली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या, रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर ही आग नियंत्रणात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 

Ministry of Education office fire, New Delhi fire incident, 
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयात आग लागल्याची माहिती सोमवारी सकाळी 9.37 वाजता मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. इमारतीच्या दुसèया मजल्यावर असलेल्या प्रशासकीय विभागातील Ministry of Education office fire  प्राध्यापकांच्या खोल्यांमध्ये ही आग भडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली. या घटनेची माहिती आयपी इस्टेट पोलिस ठाण्याला सकाळी 8.45 च्या सुमारास मिळताच एक पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले.