पुणे
Mumbai Pune Expressway accident महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनर आणि ट्रकच्या झालेल्या जोरदार धडकेत २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. तर दुसरीकडे, अंबरनाथ-उल्हासनगर मार्गावर एका भरधाव कारने मध्यरात्री धुमाकूळ घालत अनेकांना जखमी केले आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास खोपोली हद्दीत एक अत्यंत भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे तेलाचे डबे घेऊन जाणारा एक भरधाव कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट मुंबई मार्गिकेत उलटला. हा अपघात घडला त्यावेळी मागून तांदूळ घेऊन एक ट्रक येत होता. या अपघातानंतर ट्रक चालकाला वाहन कंट्रोल करता आले नाही. यामुळे हा ट्रक थेट उलटलेल्या कंटेनरवर जाऊन आदळला. ही धडक इतकी वेगवान आणि भीषण होती की ट्रकमधील चालक आणि क्लिनरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या दोन्ही अवजड वाहनांच्या Mumbai Pune Expressway accident धडकेच्या कचाट्यात बाजूने जाणारी एक एर्टिगा कारही सापडली. या कारमधील एक ८० वर्षांच्या वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. हायवे पोलीस आणि बचाव पथकाने युद्धपातळीवर वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.