नागपूर,
Nagpur Railway दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मे महिन्यात निवृत्त झालेल्या २५ कर्मचार्यांना निरोप दिला. यात प्रामुख्याने कर्मचार्यांना निवृत्तीच्या दिवशीच सेटलमेंट रक्कम अदा आली. विभागीय प्रशासनाने एकूण ११,३४,७३,५७८ चा निवृत्ती लाभ प्रदान केला. वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्वेता एच. के. छोरिया यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. निवृत्त कर्मचार्यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देताना म्हणाल्या, या रकमेचा योग्य वापर करून ते आता त्यांच्या सेवेदरम्यान राहिलेली स्वप्ने पूर्ण करू शकतील.
कार्यक्रमादरम्यान कर्मचार्यांना तडजोडीच्या रकमेव्यतिरिक्त एफआयसी कार्ड, गणना पत्रके, सेवा प्रमाणपत्रे, पीपीओ, सारांश पत्रके आणि त्यांच्या सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाच्या प्रती प्रदान करण्यात आल्या. यावेळी वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक वैभव दहीवले, सहायक कार्मिक अधिकारी सुशील कुमार लाक्रा आणि विविध शाखांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मडगाव एक्स्प्रेसच्या वेळेत बदल
वेळापत्रक जाहीर
नागपूर मध्य रेल्वेने कोकण मार्गावरील धावणार्या गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. यात नागपूर-मडगाव-नागपूर एक्स्प्रेससह तब्बल ४० महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पावसाळी वेळापत्रक १५ जून ते २० ऑक्टोबरपर्यंत अंमलात राहील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. पावसाळ्यात कोकण किनारपट्टीवर होणारा पाऊस, दरडी कोसळण्याची आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात गाड्यांचा वेळ मर्यादित राहणार आहे. पावसाळी वेळापत्रकानुसार १५ जूनपासून गाडी क्रमांक ११२०३ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस बुधवारी व शनिवारी नागपूर येथून दुपारी ३.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसर्या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता गाडी क्रमांक ११२०४ मडगाव-नागपूर गुरुवारी आणि रविवारी मडगाव येथून सकाळी ७ वाजता सुटेल आणि नागपूर येथे रात्री ९.२५ वाजता पोहोचेल.
इतवारी रेल्वेस्थानकावर तिकीट तपासणी मोहीम
२३ हजार ७१० रुपयांचा दंड वसूल
नागपूर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष ’नाका तिकीट तपासणी मोहिमे’ अंतर्गत शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानकावर मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकाच दिवसात १४ रेल्वे हजारांवर प्रवाशांची तपासणी करण्यात आली. Nagpur Railway या कारवाईत तिकीट तपासणीस, मुख्य तिकीट निरीक्षक, आरपीएफ कर्मचारी आणि इतर कर्मचार्यांचा सहभाग होता. प्रवास, अनियमित तिकीट आणि इतर तिकीट विषयक नियमभंगाची एकूण १२४ प्रकरणे आढळली. विनातिकीट प्रवासाचे २६ गुन्हे (१०,२५० रुपये), अनियमित प्रवासाचे १३ गुन्हे (४,९६० रुपये), अनधिकृत सामानाची ८४ प्रकरणे (८,४०० रुपये) धूम्रपानाचा १ गुन्हा (१०० रुपये) नोंदविण्यात आला. पथकाने प्रवाशांकडून २३ हजार ७१० रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
अजनी रेल्वे वसाहतीत आरोग्य तपासणी शिबिर
नागपूर, रेल्वे कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून आरोग्य युनिट अजनी येथे बहुउद्देशीय वार्षिक वेलनेस आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पडले. या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी लाभार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी व सल्ला सेवा प्रदान केल्या. त्यात डॉ. निर्मला गुप्ता, डॉ. शुभांगी डॉ. नलंदा गडकरी यांनी आरोग्य सल्ला दिला.
....