नवी दिल्ली,
NEET UG 21 जून रोजी होणारी नीट-यूजी परीक्षा संगणक आधारित चाचणी म्हणून घेण्याच्या मागणीवर कोणताही आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. पेपरफुटीशी संबंधित इतर प्रलंबित याचिकांसोबतच या प्रकरणाची सुनावणी जुलैमध्ये होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
राष्ट्रीय जनता दलाचे खासदार सुधाकर सिंह यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. सोमवारी, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि अरविंद कुमार यांच्या न्यायासनाने हे प्रकरण जुलैपर्यंत पुढे ढकलले. त्यामुळे नीट परीक्षेच्या फेरपरीक्षेची याचिका प्रभावीपणे फेटाळली गेली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, ते केवळ सीबीटी पद्धतीने फेरपरीक्षा घेण्याच्या मागणीवर आग्रही आहेत. तथापि, न्यायमूर्ती नरसिंह यांनी टिप्पणी केली की, न्यायालयाने यापूर्वीही अशाच प्रकारच्या याचिका फेटाळल्या आहेत.
तात्काळ सुनावणी होणार नाही
याचिकाकर्त्याच्या वकिलानेNEET UG पुनरुच्चार केला की, ते केवळ सीबीटी-संबंधित मागणीवरच आग्रह धरत आहेत, तेव्हा खंडपीठाने या प्रकरणावर तात्काळ सुनावणी होणार नाही असे संकेत दिले. न्यायमूर्ती नरसिंह म्हणाले, ‘‘आम्ही सुट्ट्यांनंतर याकडे पाहू.‘‘ यासह त्यांनी सुनावणी तहकूब केली.दरम्यान, नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात, दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने आरोपी डॉ. मनोज शिरुरे, आरोपी तेजस हर्षद कुमार शाह आणि मनीषा संजय हवालदार यांना 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सोमवारी, तिन्ही आरोपींची कोठडी संपल्यानंतर सीबीआयने त्यांना न्यायालयात हजर केले. सुनावणीदरम्यान, सीबीआयने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी केली. यानंतर, न्यायालयाने आपला निर्णय दिला आणि तिन्ही आरोपींना 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले.