बोर नावाचे प्राचीन गाव सापडले

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
सुरेश चोपणे यांचा दावा

चंद्रपूर, 
Pashan Yugin Bor village इरई आणि झरपट नदीच्या संगमाजवळ पूर क्षेत्राच्या बाहेर चंद्रपूरच्या मूळ वस्तीचे अती प्राचीन असे बोर गाव आढळले आहे. या संगमाजवळ 10 हजार वर्षापूर्वीच्या पाषाण युगीन आदी मानव, 2 हजार वर्षापूर्वीचे सातवाहन, वाकाटक आणि यादव काळातील हे गाव असल्याचा दावा इतिहास अभ्यासक सुरेश चोपणे यांनी केला आहे.
 
 
shiv
 
आज हे गाव बोर रिठ म्हणून गावकर्‍यांना माहिती आहे. तिथे 10 हजार वर्षापूर्वीची पाषाण युगीन अवजारे, 3 हजार वर्षादरम्यानच्या दगडांच्या वस्तू, 2 हजार वर्षादरम्यानची मडके, प्राण्यांची हाडे, दात आणि लोह वितळणारी भट्टीचे लोह खडक आढळले आहे. येथे प्राचीन काळात एक मंदिर होते. त्याची दोन शिवलिंग आणि मंदिराचे काही अवशेषसुद्धा पडली असून, अलीकडच्या काळातील हनुमान मंदिर बांधलेले आहे. शेती असणार्‍या लोकांना काही वर्षा पूर्वी प्राचीन नाणे आणि अलंकार सापडले होते. आज तिथे जरी शेती असली, तरी पडलेल्या घरामुळे तिथे टेकडी तयार झाली असून, अजून उत्खनन केल्यास अनेक पुरावे मिळू शकतात, असाही दावा चोपणे यांनी केला आहे.
 
 
Pashan Yugin Bor village  चंद्रपूरला गोंड राजाने वसविले असले, तरी त्यापूर्वी झरपट आणि इरई नदी परिसरात 50 हजार वर्षापासून मानवाची वस्ती होती. पुढे 5 हजार काळापासून येथे आदिवासी वस्ती करून राहायला लागले. पूर्वी सर्वत्र बारमाही नद्या होत्या आणि जवळच गावे असायची. 3 हजार वर्षांपूर्वी झरपट नदीजवळ पापामिया टेकडी जवळ हे गाव होते. इरई नदीजवळ आजच्या आरवट गावाजवळ, होमिओपॅथी कॉलेज जवळ तसेच पठाणपुरा गेटच्या जवळ केवळ 1.2 किलोमीटर अंतरावर आणि संगमापासून 1 किमी अंतरावर बोर रीठ आहे. संगमाजवळसुध्दा एक माना गाव होते. बहुदा लालपेठ, बाबूपेठ या गावांना हिंदू काळात लोकपूर आणि इंदूपूर म्हणत असावे. चंद्रपूर जिल्ह्यात गोंड राजा पूर्वी भद्रावती आणि भटाडा हे सर्वात मोठे गाव आणि व्यापार केंद्र होते. तसेच चंद्रपूर येथेसुद्धा पूर क्षेत्राबाहेर आदिवासी गावे, हिंदू गावे होती, असा अंदाज चोपणे यांनी लावला आहे.
 
गोंड राजे ते भोसले
आजच्या चंद्रपूरच्या परिसरात आणि जिल्ह्यात जी प्राचीन गावे होती, त्यावर सातवाहन, वाकाटक आणि यादव राजांचा प्रभाव होता. त्यानंतर इसवी सन 10 नंतर वणी, चांदा येथील गावात राहणार्‍या राजगोंड समाजाने सत्तेची सुरुवात केली आणि शिरपूर, बल्लाळशहा आणि चंद्रपूर येथे सत्ता सुरू केली. पुढे पश्चिम महाराष्ट्र कडील भोसले यांनी नागपूर, चंद्रपूर येथे सत्ता केली. नंतर इंग्रजांनी चंद्रपूरचा विकास केला. गोंड कालीन, भोसले आणि ब्रिटिश कालीन इतिहास आज माहिती असला, तरी चंद्रपूरचे मूळ गाव हे बोर रिठ हेच असल्याचे पुरावे सापडल्याचा दावाही चोपणे यांनी केला आहे.