२४ बळींच्या विषारी दारू कांडात 'मोठा भूकंप'

पोलिस अधिकारी निलंबित

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
पुणे
toxic liquor case पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी दारू प्रकरणात आता गंभीर आणि धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणामुळे मृतांचा आकडा २४ वर पोहोचला असून अनेक जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 

toxic liquor case 
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पोलिस प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांचा संशयास्पद सहभाग उघड झाल्याने खळबळ अधिकच वाढली आहे. उरुळी कांचन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अधिकारी अजित शिवाजी काळे आणि सुमित नंदकुमार वाघ यांना मुख्य आरोपीशी थेट संपर्कात असल्याच्या ठपक्यावरून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईनंतर अवैध दारू व्यवसाय आणि त्याला मिळणारे संरक्षण यांचे जाळे पुन्हा एकदा समोर आले आहे.विभागीय चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राधेश्याम प्रजापती याच्याशी दोन्ही अधिकारी सातत्याने संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्राथमिक तपास अहवालाच्या आधारे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे.
 
 
या प्रकरणातील मुख्य toxic liquor case  आरोपी राधेश्याम प्रजापती याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई करत भिवंडी परिसरातून तब्बल ५,९२९ लिटर मिथेनॉल जप्त केले आहे. याच मिथेनॉलचा वापर करून विषारी दारू तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.आतापर्यंत या प्रकरणात एकूण २२ जणांना अटक करण्यात आली असून तपास यंत्रणांनी चौकशीची गती वाढवली आहे. या गंभीर प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून गुन्हेगारांसह त्यांना सहकार्य करणाऱ्या आणि दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांचीही चौकशी सुरू आहे.
 
 
यापूर्वीही या प्रकरणाशी संबंधित २१ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून आता आणखी दोन अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने पोलीस दलातील अंतर्गत जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणातील कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही. संपूर्ण तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून अवैध दारू व्यवसायाचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त केले जाईल, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, विषारी दारू प्रकरणातील पुढील तपासावर आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.