मान्सुनपुर्वचा पुलगाव, कारंजात थोडा दिलासा

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
पुलगाव/कारंजा,
Pre-monsoon गेल्या दोन महिन्यांपासुन उन्हाने जिल्हा होरपळून निघाला. उन्हापासुन सुटका होण्याची वाट पाहल्या जात होती. गेल्या दोन दिवसांपासुन वर्धा जिल्ह्यात मान्सुन पुर्व पावसाचे वादळी आगमन समुद्रपूर, हिंगणघाट तालुयातून झाले. आज १ रोजी पुलगाव आणि कारंजा तालुयात पावसाने हजेरी लावल्याने उन्हापासुन थोडा दिलासा मिळाला आहे.
 
 
Pre-monsoon
 
पुलगाव येथे दुपारच्या वेळी पावसाच्या सरी कोसळल्याने महिनाभरापासून कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या पुलगावकरांना दिलासा मिळाला. वर्धा जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून ४५ डिग्री सेल्सियसच्या वरच तापमानाचा पारा दिसून येत आहे. दुपारच्या वेळी परत तापमानामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्यासारखेच आहे. शहरामध्ये सर्वत्र संचारबंदी सदृश्य वातावरण पाहायला मिळते वातावरण पाहायला मिळते. परंतु आज आलेल्या पावसामुळे गारवा पसरला. कारंजा (घा.)येथेही दुपारच्या सुमारास पावसाच्या सरी आल्या. वर्धा शहरात दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले होते.