घरगनणेत पुलगाव राज्यात प्रथम; १५ दिवसांत कामफत्ते

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
वर्धा,
census task जिल्ह्यातील पुलगाव नगरपरिषदेने नगरपरिषद क्षेत्रातील घरगणनेचे कामं ३१ मे रोजी १०० टके पूर्ण केले. केवळ १५ दिवसातच घरगनणेचे काम पूर्ण करणारी पुलगाव राज्यातील पहिली नगरपरिषद ठरली आहे. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या नेतृत्वात व निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पुलगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रभारी अधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी तीन महिन्यांपासून जनगणनेचे उत्कृष्ट नियोजन केले होते. यामध्ये शहराचे विभाजन करून ब्लॉक एचएलबी तयार करणे, आवश्यक असलेले मनुष्यबळ निवडणे, प्रशिक्षण देणे, जनगणनेबाबत जनजागृती करणे, समस्यांचे निराकरण करणे, असे विविध प्रकारचे नियोजन व तयारी करण्यात आली होती.
 
 

census task 
 
 
पुलगाव शहरातील जनगणनेकरिता ४१ ब्लॉक एचएलबीमध्ये विभाजन करण्यात आले होते. त्याकरिता ४१ प्रगणक व ४ राखीव प्रगणक असे ४५ प्रगणक तसेच त्यांच्यावर पर्यवेक्षणाकरिता ८ पर्यवेक्षक व २ मास्टर ट्रेनर असे ५५ कर्मचारी नेमण्यात आले होते. यादरम्यान शहरातील जवळपास ९ हजार ५०० घरांचा सर्वे पूर्ण करण्यात आला.census task याकरिता जनगणना विभागाचे मुकेश गोंडाने यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच नगर परिषदेचे चैतन्य कन्नाके, सचिन करवाडे, संचित डाखोरे यांनी सुद्धा सहकार्य केले.
पुलगाव नपचे काम कौतुकास्पद : जिल्हाधिकारी
पुलगाव नगरपरिषदेने घरगनणेचे काम अतिशय उत्तमपणे पूर्ण केले आहे. अगदी कमी कालावधीत १५ दिवस अगोदरच घरगनणा पूर्ण केली. जनगनणेच्या कामात नियुत अधिकारी, कर्मचारी यांच्या सहयोगाने जिल्ह्यात उत्तम काम होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी व्यत केला.