बंगळुरू,
RCB's victory procession rejected आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर आरसीबीने अंतिम सामना जिंकत चाहत्यांना जल्लोषाची आणखी एक संधी दिली. मात्र, ऐतिहासिक विजय मिळूनही यंदा बंगळुरूमध्ये पारंपरिक विजय मिरवणूक न काढण्याचा निर्णय फ्रँचायझीने घेतला आहे.आरसीबी व्यवस्थापनाने शहरातील सार्वजनिक कार्यक्रमांबाबत लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. गेल्या वर्षी विजेतेपदानंतर आयोजित करण्यात आलेल्या उत्सवावेळी झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीची आठवण अद्याप ताजी आहे. त्या घटनेत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे यंदा चाहत्यांची अनियंत्रित गर्दी टाळण्यावर भर देण्यात आला आहे.
याशिवाय, कर्नाटकच्या राजकारणातही महत्त्वाची घडामोड घडत असून डी.के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ३ जून रोजी पार पडणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमलगतच्या परिसरात हा कार्यक्रम होणार असल्याने राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर मान्यवर आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण येणार असून सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनेही विजय मिरवणूक टाळण्याचा निर्णय योग्य मानला जात आहे.दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा संघाचा तारणहार ठरला. ४२ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावांची खेळी करत त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. त्याआधी आरसीबीच्या गोलंदाजांनी गुजरात टायटन्सला १५५ धावांत रोखत सामन्यावर पकड मिळवली होती.