चंद्रपूर,
Shailesh Agarwalचंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी सोमवार, 1 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला.
Shailesh Agarwal यावेळी विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री रणजित कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, शहर अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, काँग्रेस नेते विनायक बांगडे व सुभाषसिंह गौर आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असून, निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.