बॉलिवूडमध्ये विषारी वातावरण वाढले

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
मुंबई
Shekhar Suman बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे शेखर सुमन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील वातावरणाबाबत केलेल्या विधानांमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमध्ये वाढत्या मत्सरभावना आणि अस्वस्थ वातावरणावर थेट भाष्य करत इंडस्ट्रीतील संबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
 

Shekhar Suman 
‘शेखर सुमन यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीत अनेकदा यशापेक्षा अपयशावर अधिक प्रतिक्रिया दिली जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणाचा चित्रपट फ्लॉप झाला, कोणाचे लग्न तुटले किंवा एखादी व्यक्ती अडचणीत सापडली, तर काही लोकांना त्यातून आनंद मिळतो. त्याचवेळी इतरांच्या यशाबाबतही अनेकांना अस्वस्थता वाटते, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, सध्या बॉलिवूडमध्ये मत्सराची भावना वाढली असून वातावरण Shekhar Suman अधिकच विषारी बनले आहे.शेखर सुमन यांनी इंडस्ट्रीतील संबंधांवर भाष्य करताना असेही म्हटले की, बाहेरून जरी लोक एकमेकांशी स्नेहपूर्ण वागताना दिसत असले तरी अनेकदा त्यामागे स्पर्धा आणि कटूता दडलेली असते. “वरवर मिठी मारली जाते, पण मागे पाठीत खंजीर खुपसण्यासारखे प्रकार घडतात,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.