विधानपरिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे सहा अर्ज

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
नागपूर
Legislative Council Election नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवार, 1 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पाच उमेदवारांनी सहा नामनिर्देशनपत्रे दाखल केली. राजीव पोतदार (भारतीय जनता पक्ष), राजेश जंगले (अपक्ष), सुरेंद्र लोही (अपक्ष), दिनेश ढोले (इंडियन नॅशनल काँग्रेस), अतुल लोंढे (इंडियन नॅशनल काँग्रेस) या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. भारतीय जनता पक्षाकडून डॉ. राजीव पोतदार यांनी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
 
dr. potdar
 
Legislative Council Election नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी 25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, 1 जून होती. छाननी मंगळवार, 2 जून रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरुवार, 4 जून आहे. या पोटनिवडणुकीसाठी गुरुवार, 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवार 22 जून रोजी होईल.