एसटीच्या वर्धापन दिनी १३ कर्मचार्‍यांचा सत्कार

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
विनाअपघात सेवा केलेल्या नितनवरे तसेच उत्कृष्ट कामगिरी
 
नागपूर,
ST mahamandal vardhapan din गणेशपेठ बसस्थानक परिसरात सोमवारी एसटी महामंडळाचा ७८वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी १३ कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. लालपरी गौरवरत्न पुरस्कार उमरेड आगाराचे वाहक शुभम कांबळे, तसेच १३ कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत चंद्रपूर, वर्धा व साकोली बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक व बसस्थानक प्रमुख यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
 
 
ganeshpeth-s-t-depo
 
ST mahamandal vardhapan din  २५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीकरिता विनाअपघात सेवा केलेल्या उमरेड आगारातील चालक मनोज नितनवरे तसेच उत्कृष्ट कामगिरी करणारे भंडारा, चंद्रपूर व वर्धा विभागातील ४ कर्मचार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी व्यवस्थापक श्रीकांत गभणे, कार्यशाळा व्यवस्थापक, अमोल गाडबैल, महेंद्रकुमार नेवारे, शितल गोंड, किशोर आदमने, रंजु घोडमारे, पराग शंभरकर, फाल्गुन राखडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ललिता भोयर, शैलेद्र वाघधरे, ललिता फुंडे, प्रदिप सालोडकर, राकेश रामटेके, निलेश बावणे, विजय धुदांते, अजय पवार, निलिमा चांदरकर आदींनी परिश्रम घेतले.