वरिष्ठ वकिलांना युक्तिवादाची परवानगी नाही

अंशतः कामकाजाच्या दिवसांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Supreme Court न्यायालयाचे कामकाज अंशतः सुरू असलेल्या दिवसांत वरिष्ठ वकिलांना तातडीच्या सुनावणीसाठी प्रकरणांचा उल्लेख करण्याची किंवा सुनावणीसाठी सूचीबद्ध असलेल्या प्रकरणांमध्ये युक्तिवाद करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.
 

Supreme Court partial working days, senior advocates not allowed arguments, 
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आजपासून ते 12 जुलैपर्यंत न्यायालयाचे कामकाज अंशतः सुरू असलेल्या या कालावधीत तरुण वकिलांनी त्यांच्या प्रकरणांमध्ये स्वतः युक्तिवाद करावा, याला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीला आता अंशतः कामकाज सुरू असलेले दिवस असे नाव देण्यात आले आहे. या वर्षी, या कालावधीत दर आठवड्याला तीन ते चार न्यायासने कामकाज पाहणार आहेत. माझ्या न्यायालयात कोणत्याही वरिष्ठ वकिलांना परवानगी दिली जाणार नाही, असे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.
 
 
केवळ तरुण वकीनांच युक्तिवादाची परवानगी
ते न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांचा Supreme Court समावेश असलेल्या न्यायासनाचे नेतृत्व करत असताना एका वरिष्ठ वकिलाने एका प्रकरणाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला असता न्यायमूर्ती नाथ यांनी सांगितले की, अंशतः कामकाज सुरू असलेल्या दिवसांत माझ्या न्यायासनासमोर सूचीबद्ध असलेल्या प्रकरणांचा उल्लेख करण्यास किंवा त्यांत युक्तिवाद करण्यास ते वरिष्ठ वकिलांना परवानगी देणार नाहीत. या कालावधीत माझ्या न्यायासनासमोर केवळ तरुण वकील आणि अ‍ॅडव्होकेट्स यांनाच युक्तिवाद करण्याची परवानगी दिली जाईल.