सुदृढ आरोग्यासाठी जलतरण आवश्यक : डॉ. भोयर

विदर्भ स्तरीय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
वर्धा,
Dr. Bhoyar सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायामासोबत जलतरण क‘ीडा प्रकार हा महत्त्वाचा व्यायाम आहे. त्यामुळे मनुष्याचे आरोग्य चांगले राखण्यासोबतच या खेळप्रकारातून मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. नगर परिषदेच्या जलतरण तलाव येथे लक्ष्मी लाईफ अ‍ॅक्वटीक ग्रुपच्या वतीने विदर्भ स्तरीय जलतरण स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, गिरीश उपाध्याय, संजय तराळे, नितीन डफळे, अजय वरटकर, सुधीर चौधरी, संजय झाडे, रंजना वानखेडे आदी उपस्थित होते.
 
 
Dr. Bhoyar
 
जिल्ह्यातील चांगला जलतरण खेळाडू घडावा त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करुन जिल्ह्याचे नाव देशपातळीवर लौकिक करावे यासाठी नगर परिषदेच्या असलेल्या या जलतरण तलावासोबत आणखी एक बालक व महिलांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जलतरण तलावाची निर्मिती करण्यात येत असून ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे. Dr. Bhoyar उर्वरीत कामे नगर पालिकेने लवकरात लवकर करुन घ्यावे यासाठी काही निधीची आवश्यकता असल्यास तशी मागणी करावी असे, डॉ. पंकज भोयर म्हणाले.
 
 
५ जून पर्यावरण दिन व २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक‘मात सर्व खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यापुढे वर्षभर जलतरण तलाव सुरू राहील अशी ग्वाही सुधीर पांगुळ यांनी दिली. Dr. Bhoyar जिल्ह्यातील चांगले जलतरण पटू घडावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव लौकिक करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्यात. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते खेलो इंडिया स्पर्धेत जिल्ह्यातील कास्य पदक प्राप्त केलेल्या भक्तीश कुमरे या जलतरण पटूचा सत्कार करण्यात आला.