पळसगाव परिक्षेत्रातील घटना
चंद्रपूर,
Tadoba-Andhari Tiger Reserve ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पळसगाव परिक्षेत्रांर्गत पिपर्डा बीट, कक्ष क्रमांक 561/564 येथील फायर लाईन परिसरात 30 मे रोजी टी-184 या वाघिणीचा 4 महिन्यांच्या नर बछडा मृतावस्थेत आढळून आला. या बछड्याचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
Tadoba-Andhari Tiger Reserve घटनेची माहिती प्राप्त होताच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली. घटनास्थळाची तपासणी व शवविच्छेदनानंतर या बछड्याचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बछड्याचे कोणतेही अवयव गायब नाहीत. तसेच शिकार, विषप्रयोग किंवा इतर कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आलेली नाही. हा मृत्यू नैसर्गिक स्वरूपाचा असल्याची नोंद करण्यात आली असून, नियमानुसार पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने विभागाकडून संबंधित क्षेत्रात सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. अधिक तपासणीसाठी अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.