वर्धा,
goras bhandar जिल्ह्याची ओळख असलेल्या व आपल्या सेवा व उत्पादनामुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या गो संवर्धन गोरस भंडारवर एफडीएने केलेली कारवाई आकसपूर्ण असून संस्थेची प्रतिमा मलीन करणारी आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संबंधित दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकर्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

३१ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी गोरस भंडार येथे धाड टाकून दूध व दुग्धजन्य पदार्थाचे नमुने घेतले. नमुन्यांचे परीक्षण होण्यापुर्वीच अधिकार्यांनी भंडार मधील मालाल सील करून विक्री व उत्पादनावर बंदी घातली. नुमन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच अधिकार्यांनी ठपका ठेवत ही कारवाई करणे कितपत योग्य आहे. महात्मा गांधी यांच्या विचारधारेतून गोरस भंडारची मूहूर्त मेढ रोवण्यात आली आहे. ९ दशकांपासून गोरस भंडार आपली विश्वासर्हता कायम राखून आहे. आजपर्यंत ग्राहकांनी देखील संस्थेच्या उत्पादनाबाबत तक्रार केली नाही. मात्र, एफडीएच्या अधिकार्यांनी सूडबुद्धीन कारवाई केली. त्यामुळे गोरस भंडारला दुधाचा पुरवठा करणार्यांना दुग्ध उत्पादकांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. अचानक दूध पुरवठा बंद झाल्याने दूध कुठे विकायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकर्यांच्या दुधाचे जागेवर कोणतेही परिक्षण न करता दुधाचा पुरवठा पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आला आहे. तथापि, या कारवाईमुळे विश्वासाचे प्रतिक असलेल्या संस्थेबाबत ग्राहकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. परिणामी, ग्राहक शेतकर्यांचे दूध खरेदी करणार नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकर्यांनी आपले दूध कुठे विकायचे असा प्रश्न शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.goras bhandar गोरस भंडारवर सुडबुद्धीने व आकसापोटी कारवाई करणार्या अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी गजानन लोखंडे, सुहास पाटील, सचिन टाके, दिलीप कोकाटे, बाबाराव गायकवाड, गोविंद डोळे, कमलाकर शेंडे, बाळकृष्ण राऊत, उमेश डाखाळे, शिवराम खडसकर, दशरथ मोहदुरे, मधुकर भोयर, गजानन उमाटे, अंकुश येंडे, विनोद नांदे, मधुकर टेकाळे, दिवाकर रोडे, पांडूरंग भुसारी, चंद्रशेखर कामडी, प्रमोद कामडी, श्रीराम मगर, तुकराम भुसारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.