ना शौचालय, ना दिवा-बत्तीशाळांची अवस्था दयनीय किती!

67 शाळा अंधारात; 40 शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहेच नाहीत

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
नागपूर
school condition जिल्ह्यातील शाळांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असल्याचे चित्र समोर आले आहे. शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात असला, तरी अनेक शाळांमध्ये वीज, स्वच्छतागृहे, खेळाचे मैदान आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा अद्याप अपुèया असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
 
school
 
school condition यू-डायसच्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण 3 हजार 959 शाळा कार्यरत आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा सर्व शाळांमध्ये आहे. मात्र, इतर मूलभूत सुविधांच्या बाबतीत परिस्थिती तितकीशी समाधानकारक नाही. जिल्ह्यातील 3 हजार 892 शाळांमध्ये वीज उपलब्ध असली, तरी 67 शाळा अजूनही विजेच्या सुविधेपासून वंचित आहेत. तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा वाढता वापर लक्षात घेता ही बाब गंभीर मानली जात आहे.
 
school condition विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेले खेळाचे मैदानही सर्व शाळांमध्ये उपलब्ध नाही. जिल्ह्यातील 3 हजार 847 शाळांमध्ये मैदानाची सुविधा असून 112 शाळांमध्ये या सुविधेचा अभाव आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
school condition तीन हजार 851 शाळांमध्ये मुलांसाठी, तर 3 हजार 919 शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था असली तरी अनेक शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याचे वास्तव आहे. अनेक विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
 
school condition विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. जिल्ह्यातील केवळ 1,720 शाळांमध्येच रॅम्पची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सुलभ प्रवेशाची व्यवस्था नाही. सर्वसमावेशक शिक्षणाच्या उद्दिष्टाला यामुळे धक्का बसत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
 
school condition राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असलेल्या नागपूर जिल्ह्यात शाळांमधील या मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे शिक्षण व्यवस्थेच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपलब्ध होणारा निधी प्रत्यक्षात सुविधांमध्ये कितपत रूपांतरित होतो, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

school condition जिल्ह्यातील शाळांची स्थिती
 
शाळांमध्ये उपलब्ध सुविधा        शाळांची संख्या
पिण्याचे पाणी                               3959
वीज                                            3892
खेळाचे मैदान                               3847
मुलांसाठी स्वच्छतागृह                    3851
मुलींसाठी स्वच्छतागृह                    3919 
दिव्यांगांसाठी रॅम्प                          1720