अनिल कांबळे
नागपूर,
issuing fake certificates बांधकाम कामगारांच्या सरकारी याेजनांचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेणाऱ्या टाेळीचा नागपूर ग्रामीण पाेलिसांनी पर्दााश केला आहे. प्रत्यक्षात बांधकाम क्षेत्रात एकही दिवस काम न केलेल्या व्यक्तींना ‘90 दिवस काम केल्याचे’ बनावट दाखले देऊन शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर ग्रामीण जिल्ह्याअंतर्गत दाेन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये आणि ऑनलाईन केंद्र चालकांमध्ये माेठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध याेजनांचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित कामगाराने बांधकाम क्षेत्रात किमान 90 दिवस काम केल्याचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. ही प्रमाणपत्रे अधिकृत ठेकेदारांर्माफत दिली जातात. मात्र, काही ठेकेदार आणि ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी संगनमत करून प्रत्यक्षात काम न केलेल्या व्यक्तींना बनावट प्रमाणपत्रे तयार करून दिल्याचे उघडकीस आले. मंडळाच्या याेजनांमध्ये गैरप्रकार हाेत असल्याच्या तक्रारींची दखल घेत अपर कामगार आयुक्त, नागपूर यांच्या निर्देशानुसार विशेष दक्षता पथके स्थापन करून विविध ठिकाणी तपासणी माेहीम राबविण्यात आली. या माेहिमेत शासनाची माेठी आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.
‘अयांश ऑनलाईन’वर छापा
या माेहिमेदरम्यान पहिली कारवाई बेला पाेलिस स्टेशन अंतर्गत बाजार चाैक येथील ‘अयांश ऑनलाईन सर्व्हिस सेंटर’वर धाड टाकून करण्यात आली. तपासणीदरम्यान पाेलिसांनी बांधकाम कामगार नाेंदणीसाठी वापरण्यात येणारी संशयास्पद कागदपत्रे जप्त केली. चाैकशीअंती येथील प्रमाणपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी केंद्र चालक शुभम लाेणारे (रा. धामणगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदवला आहे.
‘भाेयर इंटरनेट कॅे’ रडारवर
दुसरी कारवाई कुही पाेलिस स्टेशन अंतर्गत मांढळ येथील ‘भाेयर इंटरनेट कॅे’वर करण्यात आली. येथील तपासणीत ठेकेदाराच्या सही आणि शिक्यांसह असलेली काेरी व अपूर्ण बनावट प्रमाणपत्रे पाेलिसांच्या हाती लागली, जी बेकायदेशीर नाेंदणी प्रक्रियेत वापरण्याच्या उद्देशाने तयार ठेवण्यात आली हाेती.issuing fake certificates याप्रकरणी पाेलिसांनी कॅे चालक प्रणय भाेयर आणि ठेकेदार प्रजय विलास गजभिये (दाेघे रा. मांढळ, ता. कुही, जि. नागपूर) यांच्यावर कारवाई केली आहे.
आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी 30 मे 2026 राेजी या सर्व आराेपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4) आणि 336 (3) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टाेळ्या रडारवर असून ऑनलाईन सेंटर आणि इंटरनेट कॅेवर छापे घालण्यात आले. बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे.
- अनिल म्हस्के (अप्पर पाेलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण)