राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
शशिकरण मंदिर परिसरातील मध्यरात्रीची घटना; सुदैवाने जीवितहाणी नाही

गोंदिया, 
Truck Catches Fire नागपूर - रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील शशिकरण मंदिर परिसरातील फ्लायओव्हर जवळ रविवारी 31 मे रोजी मध्यरात्री धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 
 
aag
 
Truck Catches Fire  मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील ट्रक चालक तोशकलाल राजाराम शाहू (42) हे एमएच 40 सीएम 4099 क्रमांकाचा ट्रक रायपूरहून नागपूरकडे घेऊन जात असताना रविवारी रात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास शशिकरण मंदिर फ्लायओव्हरजवळ पोहोचताच ट्रकमध्ये अचानक आग लागली. यावेळी चालकाने प्रसगांवधान राखत वाहन रस्त्याच्या कडेवर थांबवले. घटनेची माहिती मिळताच डोंगरगाव महामार्ग पोलिस केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच सडक-अर्जुनी नगरपंचायतीच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तापर्यंत ट्रक जळून खाक झाले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास सुरू आहे.