कारंजा (घा.),
vilas vankhade : jivangaurav puraskar कारंजा घाडगे शहरातील शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, चित्रपट, पर्यावरण चळवळीमध्ये सकि‘य असलेले अष्टपैलू व्यतिमत्त्व सेवानिवृत्त मु‘याध्यापक विलास वानखडे यांची अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीच्या मिशन आयएएस जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शनिवार ६ रोजी अमरावती येथे प्रदान करण्यात येणार आहे. आय. ए. एस. अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत व दिल्ली येथील आयएएस अधिकारी भाग्यश्री बाणायत यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
vilas vankhade : jivangaurav puraskar मिशन आयएएस व डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याचे कळविले आहे. अमरावतीला होणार्या आयएएस विद्यार्थ्यांच्या सत्कारात व स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनामध्ये हा जीवन गौरव पुरस्कार व सत्कार होणार आहे. ते मिशन आयएएसचे नागपूर विभागीय संचालक असून त्यांनी आतापर्यंत अनेक सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्यक‘माचे यशस्वी आयोजनही केले आहे.