आरसीबीच्या विजयानंतर विराट-अनुष्काचा भन्नाट डान्स video

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
अहमदाबाद,
Virat and Anushka's Fantastic Dance रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने आयपीएल २०२६चे विजेतेपद पटकावल्यानंतर संघाच्या जल्लोषाचे अनेक क्षण सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मात्र, त्यामधील विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक खास व्हिडिओ सध्या चाहत्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. विजयानंतर दोघांनी केलेला उत्स्फूर्त डान्स आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.आरसीबीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ‘चॅम्पियन्स’ टी-शर्ट परिधान केलेला विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत ताल धरताना दिसतो. विजयाचा आनंद साजरा करताना दोघांनीही मोकळेपणाने नृत्य केले असून त्या क्षणांमध्ये त्यांचा उत्साह आणि आनंद स्पष्टपणे जाणवत आहे. याच सेलिब्रेशनदरम्यान विराटने संघाचे मार्गदर्शक दिनेश कार्तिक यांच्यासोबतही डान्स करत वातावरण आणखी रंगतदार केले.
 
 
 
anushka
 
व्हिडिओसोबत आरसीबीने भावनिक संदेशही शेअर केला. त्यामध्ये विराटच्या डान्सचे कौतुक करत अनुष्का शर्मा ही संघाच्या प्रवासाच्या सुरुवातीपासून सोबत असल्याबद्दल तिचे आभार मानण्यात आले. त्यामुळे हा व्हिडिओ केवळ विजयाचा उत्सव नसून विराट-अनुष्काच्या नात्यातील जिव्हाळाही अधोरेखित करणारा ठरला आहे.आयपीएल २०२६च्या अंतिम सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने १५५ धावांची मजल मारली. वॉशिंग्टन सुंदरने नाबाद अर्धशतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.