भामट्या पोलिसांनी प्रतिष्ठाला लुटले

चेन स्नॅकींगची भीती दाखवत आंगठ्या घेतल्या काढून

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
वर्धा,
Wardha News वर्धा जिल्हा गेल्या काही दिवसांपासुन विविध प्रकारच्या गुंडगीरीत आघाडीवर जात आहे. या सर्व गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हे महत्त्वाचे कारण ठरत आहे. गुंडगीरीने सीमापार काम केले आहे. वर्धेतील एका प्रतिष्ठीत व्यतीला वाहत्या रस्त्यावर अडवत त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या घेऊन बोपारा केला. ही घटना आज १ जुन रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाचा धाक कमी झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
Wardha News
 
वर्धेतील प्रतिष्ठित नागरिक, येथील एका शैक्षणिक संस्थेचे संचालक दुपारच्या सुमारास कामानिमित्त बाहेर निघाले असता त्यांना काळे झेरॉसपुढे दोन भामट्यांनी हेरले. त्यानंतर हॉटेल समाधान ते पुढच्या चौकापर्यंत लाल व काळा शर्ट घालून असलेल्या दोन भामट्यांनी त्यांचा पाठलाग केला. काही वेळात पुढे जाऊन त्यांच्या दुचाकीपुढे भामट्यांनी आपली दुचाकी आडवी लावत दटावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयाचे कर्मचारी आहोत. शहरात चेन स्कॅकींग सुरू असल्याने पोलिस अधीक्षकांनी शहरात मोहीम सुरू केली आहे. Wardha News ज्यांच्या गळ्यात सोन्याची चेन आणि हातात अंगठ्या असतील त्यांना त्या काढून ठेवण्याचा सल्ला आम्ही देत आहोत. आम्ही तुम्हाला बर्‍याव वेळापासुन आवाज देत आहोत. तुम्ही थांबत नाही, असे म्हटले. त्यावर प्रतिष्ठित व्यतीने आपल्याकडे सोन्याची चेन असल्याचे सांगताच त्यांनी हातातील अंगठ्या काढून ठेवण्याचा सल्ला दिला. प्रतिष्ठीत व्यतीने हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या काढून त्या खिश्यात ठेवल्या. दरम्यान, तुमच्या दुचाकीसोबत फोटो काढयचा असल्याचे सांगून चित्त विचलीत केले. त्यानंतर प्रतिष्ठित व्यतीला घरी जाण्याचा सल्लाही दिला.
 
 
प्रतिष्ठित व्यतीने घरी जाऊन खिश्यातील सोन्याच्या अंगठ्या बघितल्या असता त्या टपरी असल्याचे लक्षात आले. दोन्ही भामट्यांनी सोन्याच्या दोन अंगठ्या घेऊन पोबारा केला. दोन भामट्यांपैकी एकाने लाल तर दुसर्‍याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. एमएच ०३ क‘मांकाची पल्सर दुचाकीने आले होते, असे पोलिस तक्रारीत नोंदवण्यात आले आहे. Wardha News वर्धा शहरात गेल्या काही दिवसांपासुन चोर्‍यांचे प्रमाण वाढलेले आहे. सावंगी पोलिस स्टेशनच्या परिसरात मुरमाचे अवैध उत्खनन सुरू आहे. पुलगाव येथे धान्याचा काळा बाजार सुरू आहे. परंतु, पोलिस प्रशासन सध्या दारूच्या वॉटआऊट मोहिमेत गुगं आहेत. शहरातील भरवस्तीत पोलिस असल्याचे सांगुन प्रतिष्ठित व्यतीला गुंगारा दिल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह तयार झाले आहे. अंगठ्या चोर प्रकरणी वर्धा शहर पोलिसात तक‘ार दाखल करण्यात आली आहे.