अनिल कांबळे
नागपूर,
crime news घरासमाेर उभी कारची ताेडफफाेड करत ती पेटवून देणाऱ्या महिलेला मानकापूर पाेलिसांनी साेमवारी अटक केली. पुष्पा काशीराम आमले (55) असे या महिलेचे नाव आहे. जुन्या वादातून महिलेने हे कृत्य केल्याची कबुली दिली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर-गाेधनी परिसरात निखीलेष कृष्णाराव राजूरकर यांनी दाेन दिवसांपूर्वी 30 मेच्या रात्री घरासमाेर आपली बलेनाे कार उभी केली हाेती. दरम्यान राजूरकर यांच्याशी असलेल्या जुन्या वादातून पुष्पा त्यांची कार पेटवून दिली. कारवर ज्वलनशील पदार्थ टाकत असताना काेणाला लक्षात येऊ नये म्हणून पुष्पाने चेहरा ओढणीने झाकून ठेवला हाेता. गाडीला आग लावून पुष्पा तिथून पळाली. अवघ्या काही मिनिटांत ही कार जळून खाक झाली. दुसèया दिवशी सकाळी राजूरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी सीसीटीव्ही तपासले. त्यात एक महिला कारवर ज्वलनशील पदार्थ टाकताना दिसली. दरम्यान राजूरकर यांनी पुष्पावर संशय व्यक्त केला हाेता.crime news पाेलिसांनी तांत्रिक तपासावरून तिच्या माेबाईल लाेकेशनचा रेकाॅर्ड काढला असता तिनेच कार पेटवल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे पलायन केल्याचे निष्पन्न झाले. पाेलिसांनी पुष्पाला दर्यापूर तालुक्यातील जेनपूर येथून अटक केली.
.......