रेल्वेस्थानकात प्रवाशांनी तंबाखूच्या पुड्या फेकल्या कचराकुंडीत

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त रॅली
 
नागपूर,
नागरिकांना तंबाखू सेवनाचे घातक समजावून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विविध रेल्वे स्थानकांवर आज जनजागृती केली. तंबाखूमुक्त समाज घडविण्याचा संदेशही यावेळी प्रवाशांना देण्यात आला. विशेष म्हणजे, या अभियानाला प्रतिसाद देत अनेक प्रवाशांनी तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प केला आणि त्यांच्याजवळ असलेली तंबाखूची पाकिटे प्रतिकात्मक स्वरूपात कचराकुंडीत फेकली. World No Tobacco Day जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ३१ मे रोजी मध्य रेल्वेतर्फे आणि रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. त्यानुसार, स्थानक परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाविरोधातील संदेश फलक लावण्यात आले. तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी प्रवाशांचे समुपदेशन करण्यात आले.
 
 
tobo
 
World No Tobacco Day  अनेक रेल्वे स्थानकावर स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रवाशांना तंबाखूचे सेवन न करण्याची शपथ देण्यात आली. या उपक्रमाला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रवाशांनी त्यांच्याजवळ असलेली तंबाखूची पाकिटे (पुड्या) प्रतिकात्मक स्वरूपात कचराकुंडीत फेकले. अनेकांनी रेल्वे स्थानके आणि रेल्वेगाड्यांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही आणि दुसर्‍याला करू देणार नाही, असा संकल्पही यावेळी केला.