‘नालायक औलादींना धडा शिकवावाच लागतो’

योगींचा सूर्या प्रकरणी सज्जड दम

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
बिजनौर
Yogi Adityanath मैत्रीच्या नात्यात चाकूबाजीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा नालायक औलादींना धडा शिकवावाच लागतो. जर समोर खर-दूषण असतील तर शस्त्र उचलावेच लागतील, असा सज्जड दम उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर्या हत्याकांड प्रकरणावरून दिला आहे.
 
 
yogi
 
Yogi Adityanath बिजनौर येथे आयोजित एका कार्यक्रमात योगी बोलत होते. ते म्हणाले, सूर्या हत्याकांड अतिशय भीषण आहे. मैत्रीचा बहाणा करून कोणी चाकूबाजी करत असेल तर ते सहन केले जाऊ शकत नाही. अशांना धडा शिकवावाच लागेल. अहिंसा आणि मानवता हे समाजाचे मौल्यवान दागिने आहेत. पण, जेव्हा समाज आणि व्यवस्थेसमोर आव्हानं उभी राहतात तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलणे गरजेचे असते. सर्वांनी कायदा आणि व्यवस्थेचा सन्मान केला पाहिजे. कोणीही स्वत:ला त्याहून मोठे समजता कामा नये.
 
Yogi Adityanath गाझियाबाद येथे 28 मे रोजी 17 वर्षीय युवक सूर्या चौहान याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आली. जुने वैर यामागे कारणीभूत असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सूर्या हत्याकांडातील आरोप असद पोलिस चकमकीत मारला गेल्याने या प्रकरणाची चर्चा सर्व माध्यमांवर जोरदार सुरू आहे.