युवकाने केली वाहतूक पाेलिसांना धक्काबुक्की

- वर्दी उतरविण्याची दिली धमकी

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
traffic police ड्रंक अ‍ॅंड ड्राईव्ह वाहनचालकांच्या तपासणी माेहिमेदरम्यान एका तरुणाने वाहतूक पाेलिसांसह पाेलिस निरीक्षकाला सदर वाहतूक कार्यालयातच शिविगाळ करीत धक्काबुक्की केली आणि वर्दी उतरविण्याची धमकी दिली. या तरुणाने वाहतूक कार्यालयात माेठा गाेंधळ घातल्यामुळे पाेलिस कर्मचारीसुद्धा भेदरले हाेते, हे विशेष.
 
 
traffic police
 
 
वाहतूक शाखेतील कर्मचारी सचिन गाैरी हे 29 मे राेजी रात्री पाेलिस गॅस गाेदामाजवळील वाहतूक कार्यालय परिसरात सहकाèयांसह नाकेबंदी कर्तव्य बजावत हाेते. या दरम्यान संशयित वाहनांची तपासणी केली जात हाेती. एमएच-31 सीएन-3971 क्रमांकाचे वाहन अडवून चालकाची ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात येत हाेती. त्यावेळी वाहनचालक तरल उज्ज्वल थाेरात (20, नागसेन साेसायटी, मानकापूर) हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याने पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी वाहन वाहतूक कार्यालयात आणल्यानंतर चालकासाेबत आलेला त्याचा मित्र प्रिन्स बन्साेड (20, रा. वाडी) हा पाेलिसांशी उद्धटपणे वागत हाेता. ताे समाेरील खुर्चीवर पाय टाकून बसला हाेता. पाेलिसांनी त्याला व्यवस्थित बसण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्याने थेट पाेलिसांना धमकावण्यास सुरुवात केली. ‘तू मला ओळखत नाहीस का? मी तीन खून केले आहेत, तुझाही खून करीन,’ अशी त्याने धमकी दिली. यानंतर आराेपीने पाेलिस कर्मचारी सचिन गाैरी यांची काॅलर पकडून त्यांना जाेरात ढकलले. त्यामुळे ते खाली पडले. एवढ्यावरच न थांबता त्याने अश्लील शिवीगाळ करत वर्दी ाडून टाकण्याची धमकी दिली.traffic policeपाेलिस निरीक्षक सुहास चाैधरी यांनादेखील धक्काबुक्की करत ‘तुझी वर्दी उतरवून टाकेन’, अशी धमकी दिली. सचिन गाैरी यांच्या तक्रारीवरून प्रिन्सविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पथकात ‘तेच ते’ कर्मचारी
पाेलिस ठाण्यातील डीबी आणि गुन्हे शाखेप्रमाणे वाहतूक शाखेच्या पथकांमध्ये नेहमी ‘तेच ते’ कर्मचारी ठेवण्यात येतात. त्यामुळे ते कर्मचारी कारवाई कमी आणि वसुलीवरच जास्त भर देतात. वसुलीच्या कारणांवरुन कर्मचाèयांमध्ये वाद हाेतात. तसेच वाहनचालकांसाेबतही वाद हाेत असल्याच्या घटना घडत आहेत. तसेच पाेलिस कर्मचारी ‘बाॅडी वाेर्न’ कॅमेरेसुद्धा लावत नाहीत. नवनियुक्त उपायुक्तांनी पथकातील कर्मचारी बदलण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.