तभा वृत्तसेवा
आर्णी,
modi-government : आर्णी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवार, 10 जून रोजी सकाळी 9 वाजता सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ देशाची सेवा करणारे पंतप्रधान म्हणून विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व निरंतर राष्ट्रसेवेसाठी विशेष पूजा-अर्चना व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
कार्यक्रमात राष्ट्रहित, जनकल्याण व विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते