कृष्ण धवल गीतांची सुरेल संध्या

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Krishna Dhawal songs सुरवंदिता म्युझिकल ग्रुपतर्फे “कृष्ण धवल गीते” या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्ण धवल युगातील सुवर्णस्मृती जागविणारा हा रंगारंग कार्यक्रम १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सायंटिफिक सभागृह, लक्ष्मी नगर, नागपूर येथे सादर होणार आहे. या कार्यक्रमात गीता दत्त, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या दिग्गज गायकांच्या अजरामर गीतांचा सुरेल नजराणा रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
 
Krishna Dhawal songs
 
या कार्यक्रमाची संकल्पना उमा रघुरामन यांची असून, आयोजन उमा रघुरामन आणि हेमंत दारव्हेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी गोपाल के. अय्यर हे मेंटॉर म्हणून मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जथे करणार आहेत. Krishna Dhawal songs या संगीत संध्येमध्ये हेमंत दारव्हेकर, उमा रघुरामन, गोपाल के. अय्यर, हितेंद्र मुन, संजय गोसावी, अभय जिंदे, विलास बुलकुंदे, एन. एन. बैस, गीता राजगोपालन, आरती बुटी, कल्पना गणवीर, वैशाली मुन, प्रिया गुप्ता, लावण्या वाकेश आणि सुकन्या वाकेश हे कलाकार आपली सादरीकरणे करतील. कार्यक्रमाचे संगीत नियोजन महेंद्र ढोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले असून हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.
सौजन्य: विजय जथे, संपर्क मित्र