सौंदर्यासाठी इंजेक्शन घेणाऱ्यांचे सीडीएससीओने टोचले कान

‘ब्युटी बुस्टर’ ठरवले बेकायदेशीर

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली
cosmetic Injections आजकाल ‘इन्स्टंट ग्लो’च्या इच्छेने कॉस्मेटिक इंजेक्शन आणि आयव्ही ड्रिप्सचा वापर वाढला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, मॉडेल्स आणि सेलिब्रिटींना पाहून लोक हे ब्युटी ट्रेंंड्स स्वीकारत आहेत. पण हे किती धोकादायक असू शकते, हे फार कमी लोकांना माहीत आहे.
 

beauty 
cosmetic Injections अलीकडेच ‘सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ (सीडीएससीओ) ने स्पष्ट केले आहे की कॉस्मेटिक उत्पादनांचा इंजेक्शन म्हणून वापर करणे नियमांच्या विरोधात आहे आणि अशा पद्धतींवर कठोरता आवश्यक आहे. हा असा उपचार आहे, ज्यात आतून त्वचेचा रंग उजळवण्याचा किंवा टोन हलका करण्याचा दावा केला जातो. यात सामान्यतः ग्लूटाथियोन (नैसर्गिक अँटीऑक्सिडंट), व्हिटॅमिन-सी किंवा इतर अँटीऑक्सिडंट्सना इंजेक्शन/आयव्ही ड्रिपद्वारे शरीरात दिले जाते. तथापि, ‘ग्लो इंजेक्शन’ ही कोणतीही अधिकृत वैद्यकीय संज्ञा नाही. हा शब्द सामान्य बोलचालीत वापरला जातो.
cosmetic Injectionsया इंजेक्शन्समध्ये असलेले ग्लूटाथियोन, मेलॅनिन (त्वचेचे रंगद्रव्य) तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकते. यामुळे त्वचा थोडी चमकदार किंवा एकसमान दिसू शकते. हा परिणाम मर्यादित, तात्पुरता आणि व्यक्तीनुसार बदलणारा असतो. इंजेक्शन घेणे थांबवल्यावर त्वचा पुन्हा पूर्वीसारखी होऊ शकते. कोणत्याही इंजेक्शनला ‘गारंटीड स्किन व्हाइटनिंग’चा उपाय मानले जाऊ शकत नाही. सीडीएससीओने स्पष्ट केले आहे की कोणत्याही कॉस्मेटिक उत्पादनाचा इंजेक्शन म्हणून वापर केला जाऊ शकत नाही. कॉस्मेटिक्स केवळ त्वचेवर लावण्यासाठी असतात, शरीरात इंजेक्ट करण्यासाठी नाहीत.