आर्वी,
PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ देशसेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा गौरव प्राप्त केला. या गौरवशाली प्रसंगाचे औचित्य साधून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आ. सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात स्थानिक जाजूवाडी येथील संत गजानन महाराज मंदिरात आर्वी तालुका भाजपा ग्रामीण मंडळाच्या वतीने पंतप्रधान मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती करण्यात आली.
देशहित आणि जनसेवेसाठी अहोरात्र झटणार्या पंतप्रधान मोदी यांना ईश्वराने उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य द्यावे, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची प्रगतीची घोडदौड अशीच अखंड सुरू राहील, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. महाआरतीला भाजपाचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष शिरीष भांगे, भाजपा आर्वी तालुका ग‘ामीणचे अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, भाजयुमो आर्वी ग्रामीणचे अध्यक्ष आशिष टिकले, राम निस्ताने, ग्रामीणचे महामंत्री जितेंद्र ठाकरे, आदिवासी आघाड