ब्राह्मण समाजातील गुणवंतांचा वणीत गुणगौरव

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी,
Felicitation Ceremony माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच सीबीएसई परीक्षांच्या निकालात ब्राह्मण समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या गौरवार्थ अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने स्थानिक श्री जैताई देवस्थान सभागृहात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
 

Brahmin Community Felicitation Ceremony, 
यंदाच्या परीक्षांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले 13, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 9 आणि द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण 10 अशा 32 विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व भेटवस्तू देण्यात आल्या. राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पूजा आनंद कानडे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देण्यात आले. महाराष्ट्री, पाराशर, मारवाडी, मेवाडी तसेच इतर शाखांतील ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुन्नामहाराज तुगनायत होते. प्रमुख वक्ते म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे आणि डॉ. अभिजित अणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मारवाडी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष मुलचंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष व प्रमुख वक्त्यांनी Felicitation Ceremony  विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशाबरोबरच जीवनमूल्ये, सातत्यपूर्ण परिशम आणि ध्येयपूर्तीचे महत्त्व सोप्या व प्रभावी शब्दांत पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री खनगन यांनी, प्रास्ताविक विवेक देशपांडे यांनी, तर आभारप्रदर्शन अमित उपाध्ये यांनी केले.गुणगौरव सोहळ्यासाठी ब्राह्मण समाज अध्यक्ष अरुण कावडकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर खोंड, सचिव श्रीकांत उपाध्ये, कोषाध्यक्ष मिलिंद आमलेकर, श्रीवल्लभ सरमोकदम, आनंद शोभणे, आनंद जोशी, पाराशर ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष सुरेश देशकर, कीर्ती देशकर, मेवाडी ब्राह्मण समाज अध्यक्ष लक्ष्मीनारायण पांडे आणि उज्ज्वल पांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच प्रसाद चिडले, अमित उपाध्ये, अक्षय अणे, आनंद जोशी, आनंद शोभणे, परितोष पानट, वैभव मेहता, श्रवण देशकर आणि निखिल साठे यांच्यासह बहुभाषिक ब्राह्मण समाजातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. हा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला.