बसपातर्फे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Krantiveer Birsa Munda क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या १२६ व्या शहीद स्मृतिदिनानिमित्त बहुजन समाज पार्टी (बसपा)च्या वतीने फूटाळा तलाव परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाचे बसपा नेते ॲड. वीरेश वरखडे, महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे तसेच महिला नेत्या बबिता डोंगरवार यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना उत्तम शेवडे यांनी जल, जमीन आणि जंगलाच्या संरक्षणासाठी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देत आपल्या प्राणांची आहुती दिल्याचे सांगितले. तसेच आदिवासी हक्क, वनसंपत्ती आणि पर्यावरण संरक्षणाच्या प्रश्नांवर भाष्य करत केंद्र सरकारच्या काही धोरणांबाबत निषेध व्यक्त केला.
 
Krantiveer Birsa Munda
 
बसपाच्या ‘कहीं हम भूल न जाएं’ या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आयोजित अभिवादन सोहळ्याचे प्रास्ताविक युवा नेते अंकित थूल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर जिल्हा सचिव अभिलेश वाहाने यांनी तर आभार प्रदर्शन व समारोप दक्षिण-पश्चिम नागपूर अध्यक्ष सौरभ जामगडे यांनी केला. या कार्यक्रमाला रमाताई इंगळे, सदानंद जामगडे, वीरेंद्र कापसे, जनार्दन मेंढे, संगीतबाबू इंगळे, भास्कर कांबळे, आस्था शेवडे, मनोज गजभिये यांच्यासह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र