तडीपार आरोपीकडून देशी कट्टा जप्त

उमरखेड पोलिसांची कारवाई

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
externed-accused : उमरखेड पोलिस ठाणे हद्दीतून तडीपार करण्यात आलेला आरोपी अरिशोद्दीन मोहंमद तारेकोद्दीन खतीब (वय 24) हा हैद्राबाद येथून उमरखेड येथे येऊन देशी कट्टा बाळगत असल्याची गोपनीय माहिती उमरखेड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक शरद लोहकरे यांना मिळाली. या माहितीवरुन उमरखेड पोलिस डीबी पथकाने सापळा रचून कारवाई केली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 30 हजार रुपये किंमतीचा एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले.
 

y10Jun-Katta 
 
 
 
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड तसेच ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ही कारवाई सहनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, उपनिरीक्षक शरद लोहकरे, जमादार चंदन जाधव, दिगांबर गीते व संघशील टेंबरे यांनी यशस्वी केली.