सायबर फसवणूक रोखणार मानसशास्त्रज्ञ

अमेरिकेतील बँका करणार ग्राहकांचे समुपदेशन

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
न्यू यॉर्क
cyber ​​Fraud अमेरिकेत सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँकांची चिंता वाढली आहे. फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे काही बँका आता तंत्रज्ञानासोबतच मानसशास्त्रीय पद्धतींचाही अवलंब करत आहेत. अमेरिकेतील सर्वात मोठी बँक जेपी मॉर्गनने मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती केली असून, सायबर फसवणूक रोखण्यासाठी ग्राहकांचे समुपदेशन केले जाणार आहे.
 
cyber
 
cyber ​​Fraud अमेरिकेची तपास संस्था एफबीआयच्या इंटरनेट क्राईम कंप्लेंट सेंटरनुसार, 2025 मध्ये सायबर गुन्ह्यांमुळे लोकांना 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले. हा आकडा 2024 च्या तुलनेत हा आक़डा 25 टक्क्यांनी अधिक आहे, तर 2020 च्या तुलनेत चार पटीने फसवणुकीत वाढ झाली आहे. जेपी मॉर्गनने दोन वर्षांपूर्वी व्यवहार शास्त्रज्ञ एलिझाबेथ हपर्ट यांची नियुक्ती केली होती. त्यांचे काम कॉल सेंटर आणि बँक शाखांमधील कर्मचाèयांना फसवणूक करणारे लोक लोकांचा विश्वास कसा जिंकतात आणि त्यांना बँकेच्या सल्ल्यावर संशय घेण्यासाठी कसे तयार करतात हे होते. बँका आता संशयास्पद प्रकरणांमध्ये ग्राहकांशी थेट संपर्क साधत आहेत. मानसशास्त्रज्ञ ग्राहकांचे समुपदेशन करून त्यांना सायबर फसवणुकीपासून बचाव करण्याचे प्रशिक्षण देणार आहे.