जनतेच्या दारी शासन; त्रिमूर्ती नगरात शासकीय योजनांचे विशेष शिबिर

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Trimurti Nagar मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातर्फे प्रभाग क्रमांक ३६ अंतर्गत नवग्रह मंदिर, शहाणे लेआऊट, त्रिमूर्ती नगर येथे तीन दिवसीय शासकीय योजनांचे मोफत मार्गदर्शन व तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर प्रभाग ३६ च्या नगरसेविका माया हाडे तसेच सपना रोडी यांच्या सहकार्याने झाले.
 
Trimurti Nagar
 
या शिबिरामध्ये लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रार निवारण, आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, निराधार योजना, बाल संगोपन योजना, ज्येष्ठ नागरिक योजना तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ नागरिकांना उपलब्ध करून दिला जात आहे. प्रभागातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिबिराच्या आयोजनासाठी नवग्रह मंदिराचे अध्यक्ष लक्ष्मण शहाणे, सहसचिव अरविंद आकांत, प्रभाग ३६ बूथ क्रमांक ७६ च्या अध्यक्षा सपना रोडी तसेच नंदू यांचे विशेष सहकार्य लाभले.
सौजन्य: सपना रोडी, संपर्क मित्र