ब्रुसेल्स
indian companies युक्रेनविरुद्ध युद्धात रशियाला मदत केल्याच्या आरोपात भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादणार असल्याची घोषणा युरोपियनम युनियनने केली आहे. काही भारतीय कंपन्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर निर्यातबंदी लागू करणार असल्याचे संकेत युरोपियन युनियनने दिले असले तरी, अद्याप संबंधित कंपन्यांची नावे घोषित करण्यात आली नाही.
indian companies युरोपियन युनियनने यासाठी 21वे निर्बंध पॅकेज प्रस्तावित केले असून, यातंर्गत रशियाला मदत करणाèया काही भारतीय कंपन्यांवर निर्यातबंदी लागू केली जाईल अशी माहिती युरोपियन आयोगाच्या उपाध्यक्षा काजा कलास यांनी बुधवारी दिली. गेल्या दोन वर्षांतील हा सर्वात मोठा आणि कठोर निर्बंधांचा प्रस्ताव आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करणे या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या निर्बंध पॅकेजचा मुख्य भर रशियाच्या लष्करी-औद्योगिक यंत्रणेवर मर्यादा आणणे आणि युद्धासाठी मिळणारा आर्थिक पुरवठा रोखणे आहे. निर्यात निर्बंधांच्या यादीत भारतासह चीन, तुर्की, किर्गिस्तान, कझाकस्तान आणि संयुक्त अरब अमिराती येथील कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय ड्रोन निर्मितीशी संबंधित 30 हून अधिक संस्था आणि कंपन्याही या यादीत आहेत.
indian companies 90 बँकांची मालमत्ता गोठवणार
नव्या प्रस्तावांमध्ये रशियाला मदत केल्याचा आरोप असलेल्या बँका, शस्त्रनिर्मिती कंपन्या, तेल व्यापारी, तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि क्रिप्टोकरन्सी ऑपरेटर यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. सुमारे 90 बँकांची मालमत्ता गोठवण्याचा प्रस्ताव असून 30 हून अधिक बँकांच्या व्यवहारांवर कठोर नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच, 11 क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म्सवरील व्यवहारांवर बंदी घालण्याचीही तयारी सुरू आहे.