मुंबई,
Laxman Hake ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये ते एका बड्या नेत्यावर आणि ओबीसी समाजातील काही नेत्यांवर तीव्र टीका करताना दिसत असल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. हा व्हिडिओ छगन भुजबळ यांच्यावर लक्ष केंद्रीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
सांगितले सत्य...
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण देत हा प्रकार “जोडून-तोडून एडिट केलेला” असल्याचा आरोप केला. पूर्ण संभाषण न दाखवता अर्धवट व्हिडिओ पसरवून गैरसमज निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाने आणखीच ताप चढला.यानंतर पुन्हा एकदा हाके यांनी या व्हिडिओवर सविस्तर प्रतिक्रिया देत महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ कोणत्याही हॉटेल रूममध्ये शूट झालेला नसून त्यांच्या स्वतःच्या घरातला आहे. “झोळे नावाच्या एका भगिनी मला भेटण्यासाठी आल्या होत्या आणि त्यावेळी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. मात्र तो एडिट करून चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला,” असा आरोप त्यांनी केला.दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील विधानांबाबतही त्यांनी Laxman Hake आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आणि आरक्षणासंदर्भात ओबीसी नेत्यांनी ठोस भूमिका घेतली नसल्याबाबत आपला रोष असल्याचे त्यांनी सांगितले. “माझा रोष वैयक्तिक कोणावरही नाही, मात्र ओबीसी समाजासाठी नेत्यांनी काय केले हे त्यांनी स्पष्ट करावे,” असे हाके म्हणाले.
राजकीय विरोधक आणि सोशल Laxman Hake मीडियावरील चर्चांदरम्यान हाके यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवत आपण मागे हटणार नसल्याचेही स्पष्ट केले. “मी मरणाच्या भीतीनेही मागे हटणार नाही, मी माझी भूमिका मांडतच राहणार,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.या प्रकरणामुळे राज्यातील ओबीसी राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, व्हिडिओच्या सत्यता आणि त्याच्या