वणी,
Moharli Cattle Transport Case तालुक्यातील मोहोर्ली परिसरात गोवंश जनावरांची कत्तलीसाठी अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाèया तिघांविरुद्ध वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन गोवंश आणि एक पिकअप वाहन असा एकूण सुमारे 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणाजी मेश्राम (वय 26, मोहोर्ली) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. सोमवार, 8 जून रोजी रात्री 10 च्या सुमारास मोहोर्ली येथे आरोपी मोहंमद जलाल मोहंमद वखारउद्दीन (वय 21) व कैलास दत्तू कांबळे (वय 22, दोघेही यापलगोडा, ता. आदिलाबाद, जि. आदिलाबाद) तसेच नवनाथ गोरखनाथ जाधव (वय 26, मोहोर्ली) हे पिकअप वाहनातून दोन गोवंश जनावरांची वाहतूक करताना आढळून आले.
तपासादरम्यान संबंधित जनावरांना वाहनात अत्यंत क्रूरपणे कोंबण्यात आले होते. तसेच त्यांना आखूड पद्धतीने बांधून चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेली जात असल्याचा संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध Moharli Cattle Transport Case महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा प्रतिबंध अधिनियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान सुमारे 15 हजार रुपये किंमतीची दोन गोवंश जनावरे आणि अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले. पुढील तपास जमादार नीलकमल भोसले करीत आहेत.