तभा वृत्तसेवा
पारवा,
Motor Theft Case Solved, घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस ठाण्यांतर्गत येणाèया घोटी बीटमधील केळापूर तांडा येथील शेतातून पाणी देण्याची मोटार चोरी गेल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेली मोटर जप्त करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, घाटंजी तालुक्यातील घोटी बीट अंतर्गत केळापूर तांडा येथील रहिवासी शेतकरी दत्ताजी शेषराव चव्हाण यांनी रविवार, 7 जून रोजी पारवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या शेतातून 13,000 रुपये किंमतीची 5 एचपीची ‘अॅक्वा टॅक्स’ कंपनीची जुनी वापरती मोटर चोराने लांबवली होती.
या तक्रारीवरून पारवा पोलिसांनी Motor Theft Case Solved, गुन्हा दाखल केला. पारवा पोलिस ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात जमादार संदीप महाजन यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान आधारे पोलिसांनी संशयित आरोपी संजय किसन चव्हाण (वय 47, केळापूर तांडा) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानेच ही मोटर चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात चोरी गेलेली 5 एचपीची मोटर जप्त केली असून आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.