अतिक्रमण धारकांना मालकी हक्क देण्यासाठी पाऊल : आ. बकाने

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
देवळी,
MLA Bakane देवळी-पुलगाव मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या वास्तव्यातील जागेचे मालकी हक्क प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने नगरपरिषद पुलगाव व देवळी शहरातील अतिक‘मणधारक पट्टे वाटपासंदर्भातील बैठक तहसील कार्यालयात आ. राजेश बकाने यांच्या पुढाकाराने पार पडली. बैठकीला उपविभागीय अधिकारी दीपक करंडे, पुलगावच्या अपर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर, मु‘याधिकारी विजयकुमार आश्रमा, नायब तहसीलदार सयाम, अ‍ॅड. दिनेश शर्मा, आशिष गांधी, प्रल्हाद कैकाडी आदी उपस्थित होते.
 
 
MLA Bakane
 
बैठकीत पुलगाव शहरातील हिंगणघाट फैल, बरांडा परिसर, पुलगाव कॉटन मिल कामगार वस्ती आणि नाचणगाव परिसरातील गाडगेनगर अतिक‘मित वस्त्यांबाबत चर्चा करण्यात आली. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कायदेशीर मालकी हक्क मिळावा यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय प्रकि‘या गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आ. बकाने यांनी दिल्या. यावेळी ज्या भागांमध्ये सातबारा वाटप करणे शय आहे त्या ठिकाणच्या पात्र नागरिकांना लवकरच सातबारा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हिंगणघाट फैल व बरांडा परिसरातील रहिवाशांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून तो मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निश्चित करण्यात आले.
 
 
यावेळी आ. राजेश बकाने म्हणाले की, गोरगरीब, कामगार आणि अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्यांच्या घरांच्या जागेचा कायदेशीर हक्क मिळवून देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. पुलगाव व देवळी शहरातील पात्र नागरिकांना मालकी हक्काचे दस्तऐवज मिळावेत यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, नागरिकांना न्याय मिळेपर्यंत हा पाठपुरावा सुरू राहील असे ते म्हणाले.