प्रेमसंबंधातून रक्तरंजित संघर्ष; यशोधरानगरमध्ये तरुणाची हत्या

टीपू सुलतान चौकात दोन मित्रांमध्ये हाणामारी

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
murder case यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संघर्ष नगर परिसरातील टीपू सुलतान चौकाजवळ मंगळवारी दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित हाणामारीत झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
Nagpur murder case, Yashodharanagar killing
 
सलमान अशफाक अन्सारी (रा. संघर्ष नगर, यशोधरानगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या प्रकरणात मुज्जमिल (रा. संघर्ष नगर, यशोधरानगर) याचे नाव समोर आले असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राथमिक तपासात सलमानचे आरोपीच्या परिचयातील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. त्याच युवतीवर मुज्जमिलयाचेही प्रेम होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर जोरदार मारहाणीत झाले. या दरम्यान सलमान गंभीर जखमी झाला. तसेच हल्ल्यात धारदार शस्त्राचाही वापर झाल्याची चर्चा असून त्या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत. घटनेनंतर जखमी murder case  सलमानला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या युनिट-५च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.